पुण्यात चाललंय तरी काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
. पुण्यातील मगरपट्टा परिसरात मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने वाहतूक पोलिसांना मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संतापजनक प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी तरूणाला ताब्यात घेतलं
एकेकाळी पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखंल जायचं किंवा पुण्याची तशी ओळख होती. मात्र हेच पुणे आता गुन्हेगारांचं फेव्हरेट डेस्टिनेशन बनलं आहे. कारण दिवसेंदिवस हत्या, मर्डर, बलात्कार, गुन्हेगारी अशा घटना पुण्यात होतांना दिसताय. नुकताच पुण्यात मद्यधुंद अवस्थेतील तरुणाकडून वाहतूक पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मगरपट्टा परिसरात मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने वाहतूक पोलिसांना मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संतापजनक प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी तरूणाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने भररस्त्यात वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडल्याने पुण्यात याचीच चर्चा होतेय. शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. बघा या घटनेचा व्हिडीओ