गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात राडा, मीडिया प्रतिनिधींवर हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून मारहाण, नेमकं झालं काय?

| Updated on: May 17, 2023 | 8:03 AM

VIDEO | गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाज आणि दारुच्या नशेतील तरुणांकडून पत्रकारांवर हल्ला, कुठं घडला प्रकार?

नाशिक : गौतमी पाटीलचा शो म्हटला की, नेहमी गर्दी बघायला मिळते. गौतमीच्या नृत्यातील नजाकत आणि दिलखेचक अदा पाहण्यासाठी गौतमीचे चाहते नेहमीच गर्दी करताना दिसतात. पण गौतमी पाटील हिच्या एका कार्यक्रमात हुल्लडबाज आणि दारुच्या नशेतील तरुणांनी राडा केल्याचे पाहायला मिळाले. या हुल्लडबाजांकडून ‘टीव्ही 9 मराठी’चे कॅमेरामन आकाश येवले यांनादेखील मारहाण केल्याचे समोर आले आहे. तर या हल्ल्यात प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी जखमी झालेत. गौतमी पाटील हिचा नाशिकमध्ये मंगळवारी (16 मे) संध्याकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात हा धक्कादायक प्रकार घडला. नाशिकच्या नवनिर्माण सेवाभावी संस्थेकडून गौतमी पाटीलच्या विशेष लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं. नाशिकच्या ठक्कर डोम येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमादरम्यान टवाळखोरांनी मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माध्यम कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ‘टीव्ही 9 मराठी’चे नाशिकचे कॅमरामन आकाश येवले यांनादेखील मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Published on: May 17, 2023 07:26 AM
एक हसिना थी…. दो दिवाने! कुरुलकर पाठोपाठ निखील शेंडेही हनी ट्रॅपच्या जाळ्यात… देशाची सुरक्षा राम भरोसे
‘त्यांना’ या प्रकरणात दोषी बनवून अडकवले तर जात नाही ना? प्रदीप कुरुळकर संदर्भात कोणी उपस्थित केली शंका?