सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्र किनारे खुणावताय, बघा पर्यटकांची गर्दी
VIDEO | सलग आलेल्या सुटयांमुळे कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी, आजपासून रविवारपर्यत कोकण किनारपट्टीवर एन्जॉयमेंटसाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल
सिंधुदुर्ग : सलग आलेल्या सुटयांमुळे कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळतेय. आजपासून रविवारपर्यत कोकण किनारपट्टीवर एन्जॉयमेंटसाठी मोठ्या संख्येने पर्यटक आलेत. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनारी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे. उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना इथं आलेला पर्यटक सध्या समुद्राच्या पाण्यात मौज मज्जा करताना पहायला मिळतोय. गणपतीपुळे प्रमाणे सिंधुदुर्ग आणि रायगड किनारपट्टी भागात देखिल मोठ्या संख्येनी पर्यटक सुट्या एन्जॉय करताना पहायला मिळतोय. कोकणातील समुद्रकिनारी पर्यटकांनी गजबजल्याचे चित्र असताना स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे आणि हिरवाईने नटलेल्या कोकणाला सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात पसंत दिली आहे देशभरातून पर्यटक सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहे