येवल्यात भीषण पाणीटंचाई, 45 गावांसह 18 वाड्या-वस्त्यांची 35 टँकर भागवतेय तहान
येवला तालुक्यातील 45 गावे, 18 वाड्यावस्त्यांवरील नागरिक आणि जनावरांची तहान सध्या 35 टँकरच्या माध्यमातून भगवली जात आहे. येवला तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणी टंचाईला नागरिकांना तोंड देण्याची वेळ आली आहे
नाशिक, ५ मार्च २०२४ : दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील 45 गावे, 18 वाड्यावस्त्यांवरील नागरिक आणि जनावरांची तहान सध्या 35 टँकरच्या माध्यमातून भगवली जात आहे. येवला तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणी टंचाईला नागरिकांना तोंड देण्याची वेळ आली आहे. शासनाकडून येवला पंचायत समितीच्या माध्यमातून येवला शहरालगत असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांजवळील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून एका विहिरीत पाणीसाठा करण्यात येत आहे. या विहिरीतील पाण्याच्या साठ्यातून येवला तालुक्यातील तब्बल 45 गावे, 18 वाड्या वस्त्यांवरील नागरिक आणि जनावरांची तहान 35 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करत भगवली जात आहे. तर भीषण भाग येवल्यातील नागरिकांना दैनंदिन कामासोबत जनावरांकरता अधिक पाण्याची आवश्यकता असून देण्यात येणारा पाण्याचा साठा हा पुरेसा नसल्याचे अधिक पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी विनंती येवल्यातील नागरिक प्रशासनाकडे करत आहे.