पुणे-सातारा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य अन् टायर फुटण्याची समस्या, नागरिकांचा प्रशासनावर संताप
VIDEO | पुणे-सातारा महामार्गावरील खड्ड्यामुळे गाड्यांचे टायर फुटण्याच्या घटना, 'येत्या ५ दिवसात रस्त्याची कामं करा, अन्यथा...', नागरिकांनी काय दिला इशारा?
पुणे, ८ ऑगस्ट २०२३ | पुणे सातारा महामार्गावर धांगवडी गावाच्या हद्दीत रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळं रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या भागात मोठ्या खड्यात गाडीचं चाकं आपटून, टायर फुटण्याच्या, पंक्चर होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहचालक, प्रवासी त्रस्त झालेत. टोल देऊनही रस्त्याची ही अवस्था असल्यानं, नागरिकांनी महामार्ग प्रशासनावर संताप व्यक्त केलाय. सातारा शहरात पडत असलेल्या पावसामुळे सध्या राष्ट्रीय महामार्गवरून काही ठिकाणी खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी येत्या ५ दिवसात रस्त्याची कामं करून द्या अन्यथा हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करून याच रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा तेथील नागरिकांनी दिला आहे.
Published on: Aug 08, 2023 09:24 AM