छ. संभाजीनगरात ट्रक चालक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनं अडवली अन्…

| Updated on: Jan 02, 2024 | 12:19 PM

संपातील आक्रमक झालेल्या ट्रक चालकांनी धुळे - सोलापुर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना रोखलं आहे. इतकंच नाहीतर धुळे-सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या वाहन धारकांना ट्रक चालकांनी आपली वाहनं थांबवण्याचं आवाहन केलं आहे. धुळे - सोलापुर महामार्गावर ट्रक चालकांनी सर्व वाहनं अडवल्याने या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

छ. संभाजीनगर, २ जानेवारी २०२४ : छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरूच आहे. याच संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. संपातील आक्रमक झालेल्या ट्रक चालकांनी धुळे – सोलापुर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना रोखलं आहे. इतकंच नाहीतर धुळे-सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या वाहन धारकांना ट्रक चालकांनी आपली वाहनं थांबवण्याचं आवाहन केलं आहे. धुळे – सोलापुर महामार्गावर ट्रक चालकांनी सर्व वाहनं अडवल्याने या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यातील धुळे – सोलापुर महामार्ग अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे आणि हाच महामार्ग रोखल्याने दळणवळणाला मोठा फटका बसला आहे. धुळे – सोलापुर महामार्गवर शक्यतो ट्रकच्याच लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Jan 02, 2024 12:19 PM
नागपुरात काही पंपावर पेट्रोल अन् डिझेल संपलं, इंधन तुटवड्याचा रुग्णवाहिकांना फटका
मनमाड इंधन प्रकल्पाबाहेर आंदोलन, नव्या वाहन कायद्याला विरोध कायम अन् चालकांचा संप सुरू