36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 14 November 2021
राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे संप वाढत चालल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पगारवाढ करावा, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत घेण्यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेक संघटनांसह राजकीय पाठिंबाही मिळत आहे. पण काही जागी संप चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. कोल्हापूरात संप असतानाही एसटी सुरु केल्यामुळे काही अज्ञातांनी एसटीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.