Jacqueline Fernandez: ईडीचा दणका! जॅकलीन फर्नांडिसची 7.27 कोटींची संपत्ती जप्त, बॉलिवूडमध्ये खळबळ
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई: राजकीय नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ईडीने आता बॉलिवूडलाही दणका दिला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिची 7.27 कोटींची संपत्ती ईडीने जप्त कलेली आहे. तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याशी संबंधित मनी लाँडरिंगच्या प्रकरणात जॅकलीनची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने जॅकलीनचं फिक्स्ड डिपॉझिट जप्त केलं आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडलं जातं. यांचं नातं मैत्रीच्या पुढे असल्याचीही चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई-वडिलांना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला महागड्या कार दिल्याचंही समोर आलं आहे. शिवाय जॅकलिनच्या भावाला 15 लाख रुपये दिल्याचीही माहिती आहे.