मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं, कुठं झाली कारवाई?
निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव सचिव संजीव लाल याच्या नोकराचा घरात ईडीने आज धाड टाकली. या नोकराच्या घरात ईडीला ही कोट्यवधींची रोकड आढळली.
झारखंडमध्ये ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून ईडीने टाकलेल्या धाडीत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव सचिव संजीव लाल याच्या नोकराचा घरात ईडीने आज धाड टाकली. या नोकराच्या घरात ईडीला ही कोट्यवधींची रोकड आढळली. ही रोकड २० ते ३० कोटींच्या घरात असल्याची माहिती मिळतेय. ईडीला छाप्यात मिळालेल्या या रक्कमेनंतर आता नोटी मोजण्यासाठी मशीन मागवले आहे. ईडीने फेब्रुवारी 2023 मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. वीरेंद्र याला अटक करण्यात आली. ईडी एका लाच प्रकरणाचा तपास करत होती. त्यादरम्यान ईडीला आणखी काही धागे दोरे हाती लागले.
Published on: May 06, 2024 12:47 PM