‘मविआ’चे दोन नेते 2 दिवसात ED समोर, घरभेदी म्हणणार नाही, असे म्हणत रोहित पवार यांचं अजितदादांकडे बोट?
आज रोहित पवार यांची ईडी चौकशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाकरे गटातील किशोरी पेडणेकर यांचीही ईडी चौकशी होणार आहे . रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने शरद पवार गटाची रणनितीही ठरली आहे. सुप्रिया सुळे या स्वतः रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या वेळी ईडी कार्यालयात हजर
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : आज आणि उद्या महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची ईडी चौकशी होणार आहे. आज रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तर ज्या प्रकरणात आपल्याला ईडीचा समन्स आला आहे, त्याच शिखर बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये अजित पवार यांचंही नाव असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज रोहित पवार यांची ईडी चौकशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाकरे गटातील किशोरी पेडणेकर यांचीही ईडी चौकशी होणार आहे . रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने शरद पवार गटाची रणनितीही ठरली आहे. सुप्रिया सुळे या स्वतः रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या वेळी ईडी कार्यालयात हजर झाल्याचे आज पाहायला मिळाले. तर शरद पवार ईडी कार्यालयाजवळ असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात हजर असल्याचे सांगितले जात आहे. तर चौकशीपूर्वी रोहित पवार माध्यामांसमोर येत ज्या शिखर बँकेशी संबंधित बारामती अॅग्रोच्या व्यवहारासंबंधित ईडीचं समन्स आलं. आपण घरभेदी वैगरे म्हणणार नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं आहे. बघा काय म्हणाले रोहित पवार?