Bacchu Kadu | ED भाजपच्या कार्यालयातून चालत आहे – बच्चू कडू
इंग्रजानंतर सत्तेचा इतका दुरुपयोग भाजप करतेय, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई अयोग्य, ईडी च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असे बच्चू कडू म्हणाले.
ED आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे. EDच्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. पूर्वी लोकांच्या मतांनी सत्तांतर व्हायचं, आता भाजप ईडी ने सत्तांतर करत आहेत. भाजपचे सर्व नेते हरीशचंद्राची औलाद आहे का? भाजपचा एकंही नेता भ्रष्टाचारी नाही का? एकाही भाजप नेत्यावर ईडी ची कारवाई का नाही?, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. इंग्रजानंतर सत्तेचा इतका दुरुपयोग भाजप करतेय, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई अयोग्य, ईडी च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असे बच्चू कडू म्हणाले.