ED Raid : देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार कारवाई, सतीश उके यांच्या वडिलांचा मोठा खुलासा

| Updated on: Mar 31, 2022 | 12:43 PM

राज्यात ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं पहाटे धाड टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार कारवाई करण्यात आल्याचा सतीश उके यांच्या वडिलांनी आरोप केला आहे.

मुंबई : राज्यात ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं पहाटे धाड (ED Raid) टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. ईडीच्या या धाडीनंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) जोरदार हल्ला चढवलाय. तर उके यांचे वडिलांनी देखील मोठा खुलासा केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार कारवाई करण्यात आल्याचा सतीश उके यांच्या वडिलांनी आरोप केला आहे.

Published on: Mar 31, 2022 12:43 PM
Nana Patole : नाना पटोलेंचे वकील सतीश उके ‘ईडी’च्या ताब्यात, पटोलेंचा केंद्रीय यंत्रणांवर हल्लाबोल
Sanjay Raut : भाजपकडून यंत्रणेचा वापर करून झूंडशाही, शिवसेना नेते संजय राऊतांचा आरोप