ईडीच्या रडारवर ‘आयकर’चे कर्मचारी, कुणाला लावला कर्मचाऱ्यानं 263 कोटींचा चुना
आयकर परताव्या संदर्भात केलेल्या या घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र आणि कर्नाटकात ईडीची धाड, छापेमारीत झाला धक्कादायक प्रकार उघड
ईडीच्या रडावर आयकर विभागाचे कर्मचारी असून वरिष्ठ कर सहाय्यक तानाजी मंडल यांच्यासह साथीदारांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या मदतीने 263 कोटींचा परतावा घोटाळा समोर आला आहे.
ईडीने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये छापेमारी करत मोठी कारवाई केली असून यामध्ये एका कर्मचाऱ्याने सरकारला तब्बल 263 कोटींचा चुना लावला आहे. आयकर परताव्याबाबत केलेल्या या घोटाळ्याप्रकऱणी ईडीने पुणे, लोणावळा, खंडाळा, कर्जत तसेच कर्नाटकातील उडुपी येथील जमिनी जप्त केल्याचे वृत्त आहे. ईडीने त्या कर्मचाऱ्याच्या आलीशान गाड्या जप्त केल्या आहे.
तानाजी मंडल याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लॉग इन वापरून कर परताव्याच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. त्याच लॉग इनचा वापर करून तानाजी अधिकारी याने खोटे कर परतावे (टॅक्स रिफंड) करत सरकारला 263 कोटीत गंडवले. तानाजीने 263 कोटींची रक्कम एसबी एंटरप्रायझेस नावाच्या फर्मच्या बँक खात्यात जमा केली. ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत तपास केल्यावर हा प्रकार उजेडात आला.