नागपुर येथे ED ची छापेमारी, कुणाकडे टाकला छापा आणि कोण रडारवर?

| Updated on: Mar 03, 2023 | 12:53 PM

VIDEO | नागपुरात पोहचले ईडीचे पथक, प्रसिद्ध उद्योगपतींकडे टाकला छापा; या छापेमारीतून काय उघड होणार?

नागपूर : महाराष्ट्रात पुन्हा ईडीचे पथक दाखल झाले असून आता नागपुरात अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरु केली आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योगपतींकडे या पथकाने छापा टाकला आहे. नागपुरातील आर संदेश ग्रुपचे मालक रामदेव उर्फ रम्मु अग्रवाल यांचे घर आणि कार्यालयात ईडीचे पथक शुक्रवारी सकाळीच पोहचले. या पथकाने चौकशी सुरु केली. रम्मू अग्रवाल यांच्यासह आणखी काही व्यावसायिकांवर ईडीची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. नागपूरच्या कॅनल रोडवरील गौरी हाइट्स, रामदास पेठ परिसरातील रम्मू अग्रवाल यांच्या कार्यालयात कारवाई सुरू आहे. आर संदेश ग्रुपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक व्यवसाय आहेत. या व्यवसाच्या अनुषगांने इडीचे पथक कारवाई करत असल्याची माहिती मिळाली. नागपुरात अनेक मोक्याच्या ठिकाणी आर संदेश ग्रुपने जमिनी खरेदी केल्या आहेत. यामुळे चौकशीसाठी ईडीचे पथक शुक्रवारी पहाटेच पोहचले.

Published on: Mar 03, 2023 12:53 PM
अन् भाजपची झोप उडाली, संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल; बघा काय केली टीका
संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागे वरुण सरदेसाई यांचा हात?, ‘या’ भाजप नेत्यानं विधानसभेत केला गौप्यस्फोट