संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तीला ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?

| Updated on: Jan 24, 2024 | 11:11 PM

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी आज चौकशी झाली आहे. गुरूवारी किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. तर रवींद्र वायकर यांनाही भूखंड घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती.

मुंबई, २४ जानेवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीची पिडा लागल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी आज चौकशी झाली आहे. गुरूवारी किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. तर रवींद्र वायकर यांनाही भूखंड घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. तरर पुढील आठवड्यात त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीनंतर आता संदीप राऊत यांना ईडीचं समन्स पाठवण्यात आलं आहे.

Published on: Jan 24, 2024 11:11 PM
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार की नाही? जरांगेंच्या मुंबईच्या पायी मोर्च्याबद्दल काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
तब्बल ११ तासांनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर, अखेर चौकशी संपली