अमोल कीर्तिकर खिचडी चोर? काँग्रेस नेत्याच्या टीकेवर संजय राऊत यांचा पलटवार काय?

| Updated on: Mar 27, 2024 | 4:50 PM

अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर होताच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळ्यातील आरोपीला आमच्या डोक्यावर थोपविले जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही, असे म्हटले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आज लोकसभेच्या 17 जागांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये लोकसभा वायव्य मुंबईतून उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केले आहे. असे असताना आजच अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. कोरोना महामारीदरम्यान खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. तर यापूर्वी त्यांची आर्थिक गुन्हे शाखेनेही याचप्रकरणात चौकशी केली होती. अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बाजावल्यानंतर ठाकरे गटाचे नेते खादसार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कीर्तिकरच उमेदवार राहणार आहेत. उमेदवार बदलले जाणार नाहीत, असं ठामपणे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर खिचडी चोराचं मी काम करणार नाही, खिचडी चोराचं समर्थन करणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय निरूपम यांनी दिली होती. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर अमोल कीर्तिकर यांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी राहणार, आम्ही शिवसैनिक घाबरणारे नाही, डरपोक नाही. जे घाबरणारे होते ते आधीच शिवसेनेतून पळून गेल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 27, 2024 04:41 PM
हीच आघाडी राज्यातील काँग्रेसचं नुकसान करेल, जिशान सिद्दिकी नेमकं काय म्हणाले?
साताऱ्यात प्रशासनाकडून मोठी कारवाई, 16 गुडांच्या घरावर हातोडा