Rohit Pawar : शरद पवार यांच्या नातवाला ईडीचं समन्स, रोहित पवार अडचणीत येणार?
आमदार रोहित पवार यांना ईडीने आज समन्स बजावले आहे. बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार यांना ईडीने हे चौकशीचं समन्स बजावलं आहे. तर येत्या बुधवारी ईडी कार्यालयात रोहित पवारर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे.
मुंबई, १९ जानेवारी २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना ईडीने आज समन्स बजावल्याचे समोर आले आहे. बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार यांना ईडीने हे चौकशीचं समन्स बजावलं आहे. तर येत्या बुधवारी ईडी कार्यालयात रोहित पवारर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे. दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. यामध्ये रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीने धाड टाकली होती. ईडीच्या पथकाने यावेळी एकूण ६ जागी धाडी टाकल्या होत्या. ही छापेमारीची कारवाई ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली होती.
Published on: Jan 19, 2024 05:13 PM