Anil Deshmukh | अनिल देशमुखांवर ईडीची मोठी कारवाई, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
आपल्याला माहीत आहे की, हायकोर्टाने सांगितलं आहे की, तपासाची व्याप्ती वाढावा. राज्य सरकार अनिल देशमुख सोबतरोज एक पिटीशन टाकतेय आणि तपास थांबवा म्हणतंय, असे किरीट सोमैय्या यांनी सांगितले.
मुंबई : अनिल देशमुख यांनी हा काळा पैसा आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्या यात गुंतवला होता. त्यावरही ईडी लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांची 2010ची मालमत्ता ईडीने शोधून काढली आहे. आता 4 कोटी 20 लाख रुपय मालमत्ता जप्त केली आहे. वाझे प्रथम उध्दव ठाकरे यांच्यासाठी काम करायचा. त्यानंतर परमबीर सिंग, अनिल देशमुख, अनिल परब यांच्यासाठी काम करायचा. शरद पवार यांचे वसुली एजंट अनिल देशमुख हे आहेत तर उध्दव ठाकरे यांचे एजंट अनिल परब असल्याचे सांगत अनिल देशमुख आणि अनिल परब हे दोघे एक दिवस जेलमध्ये जाणार आहेत, अशी टीका किरीट सोमैय्या यांनी केली आहे. अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात गेले आहेत. ते शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याचा प्रयत्न करतील. मात्र, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी हाकलून दिल्यानंतर त्यांना ईडीकडे जावंच लागणार आहे. आपल्याला माहीत आहे की, हायकोर्टाने सांगितलं आहे की, तपासाची व्याप्ती वाढावा. राज्य सरकार अनिल देशमुख सोबतरोज एक पिटीशन टाकतेय आणि तपास थांबवा म्हणतंय, असे किरीट सोमैय्या यांनी सांगितले.