VIDEO : परीक्षा केंद्रांवर Copy आढळल्याने Nanded मधील 7 शाळांना शिक्षण विभागाची नोटीस

| Updated on: Mar 17, 2022 | 2:28 PM

आता बारावी परीक्षेसंदर्भातच एक धक्कादायक बातमी येते आहे. नांदेडमध्ये 7 परीक्षा केंद्रांना चक्क शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. कोणताही पेपर फुटीचा प्रकार घडू नये. यासाठी बोर्डाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्यामध्ये काॅप्या आणि पेपर फुटीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

आता बारावी परीक्षेसंदर्भातच एक धक्कादायक बातमी येते आहे. नांदेडमध्ये 7 परीक्षा केंद्रांना चक्क शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. कोणताही पेपर फुटीचा प्रकार घडू नये. यासाठी बोर्डाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्यामध्ये काॅप्या आणि पेपर फुटीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. नांदेड जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकाला कॉप्य , गाईड आणि चिठ्या आढळून आल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावरील शिक्षक बेजबाबदारपणे वागत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेऊन त्यांना सोडून देण्यात आले आहे.