“पांडुरंगाच्या मंदिरात चांगल्या लोकांची नावं घ्या”, दीपक केसरकरांनी नाव न घेता कुणाला लगावला टोला

| Updated on: Apr 10, 2023 | 7:52 PM

VIDEO | पंढरपूर दौऱ्यावर असताना दीपक केसरकरांनी नाव न घेता कुणाचा घेतला समाचार, बघा व्हिडीओ

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. मात्र आता सत्ताधारी गटाकडून संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अयोध्या दौऱ्यानंतर ठाकरे गटाचा शिंदे गटाकडून समाचार घेण्यात येत आहे. अशातच मंत्री दीपक केसरकर यांनीही खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पंढरपूर दौऱ्यावर असताना केसरकर संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले, ‘मी आज पवित्र ठिकाणी आहे. कशाला अशा लोकांची नावं घेता ज्यांनी तोंड उडघलं तरी शिव्या येतात. हा ओव्यांचा प्रदेश असून वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची परंपरा आहे आणि इथल्या लोकांच्या तोंडात नेहमी ओव्याच येतात. कशाला उगाच पांडुरंगाच्या मंदिरात अशा लोकांची नावं घेता चांगल्या व्यक्तीचं नाव घ्या’, असे म्हणत दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

Published on: Apr 10, 2023 07:49 PM
राज्यात अवकाळीचा फटका, नाशिकनंतर मुख्यमंत्री उद्या करणार ‘या’ जिल्ह्याची पाहणी
अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेनेनं घेरलं, संजय राऊत हे कलीयुगातील शकुनीमामा, कुणाचं टीकास्त्र