‘काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा’, विरोधकांच्या टीकेवर शिक्षण मंत्री दीपक केसकरांचं प्रत्युत्तर, म्हणाले….
विद्यार्थ्यांची चेष्टा करत असल्याचे म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले असून सरकारवर अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला होता. यावर केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं. 'एक राज्य एक गणवेश' हे तत्व राज्याचे स्विकारलेलं आहे. अनेक नवीन उपक्रम राबविल्यानंतर त्यांच कौतुक करण्याऐवजी त्यावर टीका करणं चुकीचं असल्याचे केसरकर म्हणाले.
एखादा गणवेश शिवताना चुकला असेल तर तो बदलून दिला जाईल, असं वक्तव्य करत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गणवेशावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे गणवेश दिले जातात, तर मुलांना गणवेश शिवून देताना महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे दीपक केसरकर म्हणाले. यासह विरोधकांनी टीका करण्यापेक्षा डोळसपणे बघावं असं म्हणत दीपक केसरकर यांनी विरोधकांना चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळाले. दीपक केसरकर पुढे असेही म्हणाले की, हिल्यांदाच गणवेश शिवण्याचं काम हे महिलांना देण्यात आलं आहे. त्यामुळे वीस हजार महिलांना रोजगार मिळाला. तर महिला औद्योगिक विकास मंडळ यावर काम करतंय. जी मुलांची मागणी असते त्यानुसार गणवेश तयार करावा लागतो. जर एखादा ड्रेस शिवताना चुकला असेल तर तो बदलून देण्यात येईल, असेही केसरकर यांनी म्हटलं.