संडे हो या मंडे आता रोज खाता येणार नाही अंडे! अंड्यांचे दर वाढले
परवडणाऱ्या दरात मिळणारी अंडी महागल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम, मुंबईत अंड्यांच्या दरात ३० रूपयांची वाढ...एका अंड्यासाठी किती मोजावे लागणार रूपये?
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं आपण ऐकत आलो आहोत. मात्र आता हेच अंडे रोज खाता येणार नाहीत. कारण अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. अंड्याच्या दरात तब्बल ३० रूपयांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात अंड्यांचा दर हा ९० रूपयांवर गेला आहे. तर मुंबईत एका अंड्यासाठी साडेसात रूपये मोजावे लागणार आहेत.
अंड्यांच्या दरवाढीचा सर्वसामान्यांचा बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. रोज खाता येण्यासारखे अंडे महागल्याने अंडे रोज खावे की नाही, असा प्रश्नच सर्वसामान्यांना पडला आहे.
Published on: Jan 16, 2023 09:46 AM