Virat Kohli Birthday : 8 वर्षाच्या जबरी फॅननं दिल्या विराटला अनोख्या शुभेच्छा, रबर स्टॅम्पनं साकारलं भन्नाट पोट्रेट

| Updated on: Nov 05, 2023 | 4:59 PM

8 वर्षाच्या चाहत्यानं विराट कोहलीला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईतील विक्रोळीमध्ये राहणाऱ्या युग निलेशकुमार चव्हाण या आठ वर्षीय कलाकाराने विराटला दिल्या भन्नाट शुभेच्छा

मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | देशासह जगभरात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला जगभरातून त्याचे चाहते वेगळ्या रूपाने शुभेच्छा देत आहे. अशातच 8 वर्षाच्या चाहत्यानं विराट कोहलीला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईतील विक्रोळीमध्ये राहणाऱ्या युग निलेशकुमार चव्हाण या आठ वर्षीय कलाकाराने विराटला भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. 5 नोव्हेंबर 2023 या तारखेचे स्टँप मारुन विराटचे अनोखे पोट्रेट साकारले आहे. 1543 वेळा स्टँप मारुन हे पोट्रेट साकारले आहे. साडे सहा तासांचा वेळ यासाठी त्याला लागला. 24X30 इंचाचे हे पोट्रेट आहे. यासाठी त्याचे वडील निलेशकुमार यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.

Published on: Nov 05, 2023 04:58 PM
BIG BREAKING : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईत उपचारांसाठी तातडीनं आणणार
Air Pollution : वायू प्रदूषण रोखण्यासाठी BMC ची शक्कल, मुंबईचे रस्ते पाण्यानं धू-धू धुतले