सलीम कुत्तावरून जुनेच सहकारी सभागृहात आमने-सामने, ‘त्या’ फोटोवरून गिरीश महाजन टार्गेटवर

| Updated on: Dec 19, 2023 | 11:10 AM

अधिवेशनात एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस महाजन यांच्या मदतीसाठी धावून आलेत. ज्या लग्नातील फोटोवरून खडसेंनी महाजन यांना घेरलं. त्या फोटोवरून चिरफाड केली.

मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सलीम कुत्तावरून सुरू असलेलं राजकारण आता मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचलं. अशातच अधिवेशनात एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस महाजन यांच्या मदतीसाठी धावून आलेत. ज्या लग्नातील फोटोवरून खडसेंनी महाजन यांना घेरलं. त्या फोटोवरून चिरफाड केली. विधानभवनात एकनाथ खडसे यांनी नाशिकच्या लग्नात मंत्री गेले असून त्यांनी थेट महाजन यांचं नाव घेतलं. तर यावेळी राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली इतकंच नाहीत एसआयटी चौकशीची मागणी केली. तर प्रवीण दरेकर यांनी नाव घेता येणार नाही असं म्हणत या चर्चेच्या नोटीवरच आक्षेप घेतला. यावरून सभापतींनी कामकाजातून नाव काढलं. पण खडसेंच्या आक्रमकतेवरून त्यांनी महाजनांवर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले. बघा सभागृहात काय म्हटले देवेंद्र फडणवीस?

Published on: Dec 19, 2023 11:10 AM
शिंदे समितीकडून अहवाल सरकारकडे; मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार?
सत्तेत तुम्ही, तरी निधीत कमी? सभेमधून छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे?