Eknath Khadse | प्रत्येक जण आपआपल्या कुवती प्रमाणं बोलतो, गुलाबरावांच्या वक्तव्यावरुन खडसेंचं उत्तर
नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आहेत. गुलाबराव पाटलांनी निवडणुकीच्या ओघात केलेलं ते भाष्य आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत डिवचलं आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आहेत. निवडणुकीच्या ओघात केलेलं ते भाष्य आहे. गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंना लोकांनी निवडून दिलं आहे हे माहिती आहे. मी तीस चाळीस वर्षात एकही निवडणूक हारलेलो नाही. जळगावच्या विकासकामामध्ये सर्वाधिक काम मी केलंय, असं एकनाथ खडसे म्हणाले.