एकनाथ खडसे बावचळले, त्यांच्याकडे पायात चप्पल घालायला पैसे नाहीत; गिरीश महाजन यांची जहरी टीका

| Updated on: Dec 18, 2023 | 7:21 PM

एकनाथ खडसे यांच्या पोटात दुखतंय. खडसे 137 कोटी रूपये मुरूम चोरला विकला म्हणून त्यांना दंड तर भोसरीमधील एका प्रकरणात 27 कोटींचा दंड झालाय. त्यामुळे आता खडसेंकडे पायात चप्पल घालायला पैसे उरले नाही, गिरीश महाजन यांचा जोरदार हल्लाबोल

नागपूर, १८ डिसेंबर २०२३ : एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती ठीक नाही त्यामुळे माझ्यावर सतत आरोप करत आहेत. नाशिकचा विषय गेल्या ९ वर्षांपूर्वीचा आहे. सर्वजण सगळ्या पक्षाचे नेते पदाधिकारी, खासदार, आमदार, व्यापारी, उद्योजक उपस्थित होते. ज्या लग्नाला गेलो तेथील मुलीच्या नातेवाईकांचा दाऊदशी संबंध आहे. मात्र त्यावेळी याची चौकशी करून तसा अहवाल समोर आला की, कुणाचाही दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे स्पष्टपणे भाष्य करत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर महाजन यांनी खोचकपणे वक्तव्य करत असे म्हटले की, खडसे यांच्या पोटात दुखतंय. खडसे 137 कोटी रूपये मुरूम चोरला विकला म्हणून त्यांना दंड तर भोसरीमधील एका प्रकरणात 27 कोटींचा दंड झालाय. त्यामुळे आता खडसेंकडे पायात चप्पल घालायला पैसे उरले नाही म्हणून बावचळलेले आहे, असे म्हणत महाजन यांनी खडसेंवर खोचक टीका केली

Published on: Dec 18, 2023 07:21 PM
सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे थेट संजय राऊत यांच्यापर्यंत? शिवसेना नेत्याचं मोठं भाष्य
उद्धव ठाकरे यांनी मानले भावजयचे आभार, म्हणाले…