गिरीश महाजन बेडकासोबत कसे जातात ते माहिती नाही – एकनाथ खडसे
जळगाव जिल्ह्यातील चित्रं वेगळं आहे. मात्र गिरीश महाजन बेडकाबरोबर कसे जातात ते माहिती नाही. याबाबतचे सविस्तर उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी देण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. महाजन यांचा टीकेचा रोख राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा शिवसेनेवर अधिक असतो. तरीही शिवसेनेकडून महाजनांना उत्तर दिलं जात नाही. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एकिकडे गिरीश महाजन हे शिवसेनेला हिणवतात, बेडूक म्हणतात. मात्र दुसरीकडे जिल्हातील शिवसेनेच्या पालक मंत्र्यांसोबत चहा घेतात, जेवण करतात. छुपी युती करतात. जळगाव जिल्ह्यातील चित्रं वेगळं आहे. मात्र गिरीश महाजन बेडकाबरोबर कसे जातात ते माहिती नाही. याबाबतचे सविस्तर उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी देण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
Published on: May 15, 2022 02:45 PM