अमित शाह यांच्या दौऱ्याला अजित पवार का होते गैरहजर? एकनाथ खडसे यांनी थेट सांगितलं कारण
VIDEO | अमित शाह काल मुंबईत दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस होते मात्र अजित पवार शाहांसोबत का दिसले नाही? एकनाथ खडसे यांनी थेट सांगितलं कारण
जळगाव, २४ सप्टेंबर २०२३ | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह काल मुंबईत आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसही होते. पण दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले. हीच गैरहजेरी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या मुंबईच्या दौऱ्याला अजित पवार का होते गैरहजर? याच कारण थेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. जळगावात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, अजित पवार यांनी हजर रहावं की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना डावलंलं जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही नाराजी अजित पवार यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावर गैरहजर राहून दर्शविली आहे.
Published on: Sep 24, 2023 03:48 PM