Girish Chaudhari | एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींच्या ईडी कोठडीत वाढ
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना आता 26 जुलैपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना आता 26 जुलैपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे. ईडीचा तपास अद्याप पूर्ण न झाल्यामुळे ईडीने पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली होती. न्यायाझीश एस. एच. गवलानी यांनी गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ केली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत गिरीश चौधरी यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी 15 जुलै रोजी कोर्टात केला. या प्रकरणात आम्हाला अनेक साक्षीदार सापडत आहेत. काही साक्षीदार पुढील आठवड्यात ईडीच्या कार्यलयात येणार आहेत. त्यामुळे साक्षीदार आणि आरोपी यांचा आम्हाला समोरासमोर तपास करायचा आहे. त्यामुळे 7 दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी कोर्टात केली होती.