ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत…बड्या नेत्याचं शक्तिप्रदर्शन, कोणते नेते आज भरणार अर्ज?

| Updated on: Oct 28, 2024 | 1:59 PM

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्होंबरला विधानसभा निवडणूक होणार असून विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर उद्या 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे.

विधानसभा निवडणुकीकरता उमेदवारांना अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना याच मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने तेही आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. तर बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा पवार कुटुंबात लढत पाहायला मिळणार आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापार्श्वभूमीवर दोघांकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी आणि बारामती या दोनही मतदारसंघाकडे हायप्रोफाईल लढती म्हणून पाहिलं जातं. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे केदार दिघे असणार आहेत. तर बारामतीत काका विरूद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. सात वेळा आमदार असलेले अजित पवार हे राष्ट्रवादीकडून लढणार आहेत तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Published on: Oct 28, 2024 01:59 PM
Sharmila Thackeray : ‘तर आम्हाला निवडून द्या…’, शर्मिला ठाकरेंनी अमित ठाकरेंच्या रॅलीतून महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
‘जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली’, अजितदादा नेमकं काय म्हणाले?