मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात रात्री दोन तास खलबतं! वर्षावर झालेल्या बैठकीचा अजेंडा बीएमसी निवडणूक?

| Updated on: Sep 06, 2022 | 7:54 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या मुंबई महापालिकेच्या मिशन 150 च्या अनुषंगाने ही बैठक झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातोय. या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यात समन्वय कसा साधता जातो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. रात्री उशिरा ही बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah on BMC Election 2022) यांनी दिलेल्या मुंबई महापालिकेच्या मिशन 150 च्या अनुषंगाने ही बैठक झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातोय. या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यात समन्वय कसा साधता जातो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेमकी काय चर्चा झाली, यावरुन आता तर्कवितर्कांना उधाण आलंय. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर लगेचच ही शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यामुळे देखील या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवाय पालिका निवडणुकीत भाजपची रणनिती काय असली पाहिजे, यावरही थेट भाष्ट केलं होतं. भाजप पूर्ण ताकदीने आगामी पालिका निवडणुकीला सामोरं जाईल, असे स्पष्ट संकेतच त्यांनी मिशन 150 च्या माध्यमातून दिले होतं. त्यामुळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाची भूमिका नेमकी कशी असणार आहे, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published on: Sep 06, 2022 07:54 AM