‘बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं’, ठाकरे गटातील खासदाराच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा संताप

| Updated on: Nov 02, 2024 | 12:06 PM

शिवसेनेचे उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत अरविंद सावंत यांनी जे वक्तव्य केलं त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान, लाडक्या बहि‍णींबाबत असं वक्तव्य करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला असताना यावर एकनाथ शिंदे यांनी देखील खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात महिलांनाचा अपमान करणं हे दुर्देवी आहे. ज्यांनी हे केलंय त्यांना सर्व लाडक्या बहिणी मिळून घरी बसवतील. त्यांना त्यांची जागा दाखवतील. जर आज बाळासाहेब ठाकरे असते आणि कोणत्या शिवसैनिक असं केलं असतं तर त्याचं थोबाड फोडलं असतं. त्यामुळे असं महिलांसंदर्भात वागणाऱ्यांविरोधात लाडक्या बहिणी नक्कीच त्यांचा बदला घेतील’, असं म्हणत अरविंद सावंतांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केलाय. अरविंद सावंत यांनी शायना एन.सी. याच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. “त्यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्या. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो” असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं आहे. या वक्तव्याप्रकरणी शायना एन.सी. यांनी सावंतांविरोधात नागपाडा पोलिसात गुन्हा दाखल केलाय.

Published on: Nov 02, 2024 12:04 PM
Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
राष्ट्रवादीत उभी फूट, पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अदृश्य शक्ती…’