शिंदे गटातील खासदार राहुले शेवाळेंनी घेतली अमित शाहंची भेट
शिंदे गटातील मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी ही भेट होती.
मुंबई: शिंदे गटातील मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी ही भेट होती. “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कित्येक दिवस प्रलंबित आहे. अमित शहांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वसन दिलय” असं राहुल शेवाळे म्हणाले.
Published on: Aug 02, 2022 05:04 PM