Eknath Shinde : सीबीआयला महाराष्ट्रात तपासाची परवानगी नाहीच, ठाकरे सरकारचा निर्णय कायम
राज्यातील अनेक प्रकरणामध्ये केंद्राचा हस्तक्षेप वाढला होता. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता.
मुंबई : सीबीआयला महाराष्ट्रात तपासाची परवानगीच नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तपासाबाबतचे अधिकार राज्य सरकारने स्वत:कडेच ठेवलेले आहे. शिंदे (Eknath Shinde) सरकारची स्थापना होताच त्यांनी (MVA) महाविकास आघाडी काळात झालेल्या अनेक निर्णयाला स्थगिती दिली आहे. यात हा एक मोठा निर्णय असल्याचं बोललं जातंय. (CBI) सीबीआयला शिंदे सरकारच्या काळातही राज्याची परवानगी घेऊन तपास करावा लागणार आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे ममता बॅनर्जी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन मार्गक्रमण करणार की काय असा सवाल उपस्थित झाला आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता. केंद्र सरकार आपल्या यंत्रणांचा दुरूपयोग करत असल्याचा ठपका ठेवत हा निर्णय घेण्यात आला होता.