मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार? मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले, Watch Video
VIDEO | मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका जाहीर, 'सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाच्या आरक्षण काही लोकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय'
मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. दरम्यान, संपूर्ण मराठा समाज हा आरक्षण मिळावं यासाठी लढत असताना ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. दरम्यान, तसं झालं तर ते कायद्याच्या चौकटीत बसेल की नाही यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे. ‘सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाच्या आरक्षण काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही’, असे स्पष्टपणे सांगितले. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या असा संभ्रम काही लोकांकडून पसरवले जात आहेत. ओबीसी समाजावर कुठलंही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिल पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देणे सरकारची भूमिका आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.