ठरलं… शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार, फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, कोणती खाती दिली जाणार?

| Updated on: Dec 04, 2024 | 11:49 AM

एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचं समजतंय. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दिल्लीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांसमोर गृहखात्याची मागणी केली होती. मात्र भाजप गृहखातं सोडण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळाले. जर गृहखातं मिळालं नाही तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. दरम्यान, दिल्लीत अमित शाह यांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना दोन ऑफर देण्यात आल्या होत्या.एक म्हणजे उपमुख्यमंत्री आणि दुसरं म्हणजे केंद्रात मंत्री… पण केंद्रात न जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे पाहायला मिळालं. अशातच सूत्रांकडून मोठी माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचं समजतंय. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबत एकनाथ शिंदे यांना गृहखात्याऐवजी नगरविकास खात्यासह आणखी एखादे महत्त्वाचे खाते मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे. तर उद्या मुंबईतील आझाद मैदानात संध्याकाळी पाच वाजता नव्या सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह २० हून अधिक मंत्री शपथ घेणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: Dec 04, 2024 11:49 AM