Eknath Shinde Video : ‘फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की छळ केला? माफी मागा, अन्यथा…’; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप अनावर

| Updated on: Mar 18, 2025 | 2:16 PM

‘औरंगजेब क्रूर शासक होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर’, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. यावर एकनाथ शिंदेंनी भाष्य केले आहे.

‘हर्षवर्धन सपकाळ क्रूर प्रशासक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना आलमगीर औरंगजेबाशी करताय?’, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील सभागृहात बोलत असताना काँग्रेसवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले, औरंगजेब हा देशद्रोही होता. औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा मोठा छळ केला. त्यांचे डोळे काढले आणि जीभ छाटली, असे सांगत एकनाथ शिंदेंनी हर्षवर्धन सपकाळ यांचा चांगलाच समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांची औरंगजेबसोबत तुलना करताय त्यांनी तुमची जीभ छाटली का? असा संतप्त सवालही यावेळी सभागृहात केला. ‘कोणाची तुलना कोणाबरोबर करताय? शिवाजी महाराज यांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय? तर क्रूर प्रशासक म्हणून औरंगजेबाबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना करताय?’, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर संताप व्यक्त केला तर नाना पटोले यांना उद्देशून शिंदे असेही म्हणाले, ‘नाना… तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य औरंजेबाचं, देशद्रोहाचं समर्थन करतंय म्हणजे तेही देशद्रोही आहेत, त्यांच्यावर खटला दाखल करावा का?’, असा सवाल शिंदेंनी केला.

Published on: Mar 18, 2025 02:16 PM
Eknath Shinde : कालची घटना ही साजिश होती, पण.. ; एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं
Satish Bhosale : खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं