रवी राणा अन् महेश शिंदेंच्या ‘लाडकी बहीण’च्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘कोणाचा बाप बहिणींचे पैसे परत…’

| Updated on: Aug 14, 2024 | 10:52 AM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा आणि शिंदेंचे आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झालेला असताना सुप्रीम कोर्टाने देखील राज्य सरकारला फटकारलं आहे. लाडकी बहीण योजनेला वाटायला पैसे आहेत मग जमिनीच्या मोबदल्यासाठी का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल

आमदार रवी राणा आणि महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. कोणाचा बाप आला तरी योजना बंद होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर जमिनीच्या मोबादला प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजनेला इशारा दिला आहे. पुण्यातील जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टानं शिंदे सरकारला धारेवर धरलं. मोफत वीज, लाडकी बहीण योजनेला वाटायला पैसे आहेत मग जमिनीच्या मोबदल्यासाठी का नाही? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला. बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तोडगा काढा, मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री शिंदेंशी बोलावं, याचिकाकर्ते टी एन गोदाबर्मन यांच्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 14, 2024 10:52 AM
दादागिरीऐवजी गांधीगिरी? अजित पवारांची नवी स्टॅटेजी? दादा म्हणाले, माझी चूक झाली…
जरांगे विधानसभा लढणार की आमदारांना पाडणार? भुजबळांचा कार्यक्रम करणार, जरांगेंचा पुन्हा इशारा