Ulhasnagar | उल्हासनगरात बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाचं मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

| Updated on: Sep 08, 2021 | 3:40 PM

उल्हासनगरमध्ये हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल उभारण्यात येणार असून त्याचं भूमिपूजन शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. उल्हासनगरातील कॅम्प ४ मध्ये असलेल्या व्हीटीसी मैदानात हे क्रीडासंकुल उभारलं जाणार आहे.

उल्हासनगरच्या व्हीटीसी मैदानात उभारल्या जाणाऱ्या या क्रीडासंकुलात जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या क्रीडा संकुलातून देशासाठी खेळणारे अनेक खेळाडू घडतील, असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिपूजनाप्रसंगी व्यक्त केला. याच कार्यक्रमात उल्हासनगर शहरातील शांतीनगर आणि वडवली इथल्या दोन मलनिस्सारण प्रकल्पांचं उद्घाटनही करण्यात आलं. तर उल्हासनगर शहरातील भूमिगत गटारं साफ करण्यासाठी एक रोबो खासगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून महापालिकेला देण्यात आला असून त्याचं हस्तांतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. दुसरीकडे उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन नवीन बोटी सुद्धा सामील झाल्या असून त्यांचं लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, उल्हासनगर महापालिकेच्या महापौर लिलाबाई आशान यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Pravin Darekar | चिपी विमानतळ प्रकरणी प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा
Ramdas Tadas Exclusive | भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण ? काय आहे नेमकं प्रकरण ?