मंत्रिपदाआधीच एकनाथ शिंदेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

| Updated on: Jun 30, 2022 | 2:30 PM

एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ते मुंबईत दाखल झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रातला राजकीय विरोध लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गोव्यात थांबलेल्या आमदारांसोबत बैठक घेतली. बैठक पार पडल्यानंतर ते मुंबईत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ते मुंबईत दाखल झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रातला राजकीय विरोध लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य पोलिसांची एक टीमसुद्धा त्यांच्यासोबत असेल. मुंबई विमानतळावरील रस्त्यावरही पोलिसांचा गराडा आहे.

“..त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो”, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर केल्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र