मुंबईत पुन्हा ठाकरे विरूद्ध शिंदे सामना रंगणार? लोकसभेनंतर विधानसभेतही ठाकरे गट बाजी मारणार? ‘या’ जागांवर लढणार?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मविआतील ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात जागा वाटप झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र या सगळ्या जागावाटपात सर्वांचं लक्ष आहे ते मुंबईच्या जागांवर... दरम्यान यंदा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही ठाकरे विरूद्ध शिंदे असा सामना रंगताना दिसणार
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रार विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मविआतील ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात जागा वाटप झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र या सगळ्या जागावाटपात सर्वांचं लक्ष आहे ते मुंबईच्या जागांवर… दरम्यान यंदा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही ठाकरे विरूद्ध शिंदे असा सामना रंगताना दिसणार आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी २५ जागांवर ठाकरे गटाची शिवसेना निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत तर शिंदे गटाकडून १७ जागा लढवण्यावर एकमत झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मुंबईतील जास्तीत जास्त शिवसेनेने लढवाव्यात अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेमक्या कोणत्या २५ जागांवर लढण्याची तयारी केली आहे.. बघा स्पेशल रिपोर्ट