‘डोकं भाजपचं, कंबर सेनेचं आणि पाय राष्ट्रवादीचे’! मंत्री गुलाबराव पाटील यांनी कुणाला उद्देशून केली खोचक टीका, Watch Video

| Updated on: Aug 28, 2023 | 11:08 PM

VIDEO | अजित पवार सत्तेत आले अन् खोक्यावाल्यांचे तोंड बंद झाले, एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय केलं वक्तव्य, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३ | अजित पवार आमच्या सोबत आले म्हणून खोके वाल्यांचे तोंड बंद झालेत. असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलं. इतकंच नाहीत आताचं तीन पक्षाचं सरकार कसं आहे याची नवी व्याख्याही गुलाबराव पाटील यांनी केली. गुलाबराव पाटील यांचा जळगावात कार्यक्रम होता. ते खोक्यांच्या आरोपांवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलल्याचे पाहायला मिळाले. मात्र यापूर्वी कार्यकर्त्येच नव्हे तर विरोधात असताना अजित पवार यांनीही शिंदे गटावर खोक्यांची टीका करत होते. सत्तेत गेल्यानंतर हे त्रिशुल आणि ट्रिपल इंजिनचं सरकारचा दावा नेत्यांनी केला. मात्र ‘डोकं भाजपचं, कंबर सेनेचं आणि पाय राष्ट्रवादीचे’ असं आताचं सरकार आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. बघा जळगावातील जाहीर सभेत गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले…

Published on: Aug 28, 2023 11:06 PM
अजितदादा शांत…अन् छगन भुजबळ अटॅक मूडमध्ये! शरद पवार यांच्यावर भुजबळांचा थेट निशाणा, म्हणाले…
‘सामना’तून अजित पवार यांचा समाचार, शरद पवार यांच्या मेहनतीवर अजित दादांचा डल्ला, संजय राऊत काय म्हणाले?