‘आमचा हक्क आम्ही सोडणार नाही’, दसरा मेळाव्यावरून ‘या’ शिवसेनेच्या नेत्याचा निर्धार

| Updated on: Sep 30, 2023 | 11:49 AM

VIDEO | दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यावरून गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे बघायला मिळत आहे. शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा याचं वेगळंच नातं असल्यानं यंदा कोणाचा आवाज शिवतीर्थावर घुमणार याकडे साऱ्यांचे लक्ष

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थ येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर कुणाचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार यावरून चर्चा सुरू आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वीच दोन्ही गटानं मुंबई महापालिकेला शिवाजीपार्कचं मैदान दसरा मेळाव्याकरता मिळावं यासाठी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे आता कुणाचा आवाज घुमणार याकडे लक्ष लागले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा दादर येथील शिवतीर्थावरच होणार असल्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. तर गेल्या वर्षी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला झुकतं माप दिल्याचेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. इतकेच नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही आमचा हक्क सोडणार नाही, असे स्पष्टच संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 30, 2023 11:47 AM
यंदा कुणाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार अन् कुणाचा आवाज घुमणार? शिंदे की ठाकरे?
भाजपचे दिग्गज नेते यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार, ‘या’ 7 नेत्यांना मिळणार खासदारकीचं तिकीट?