Sanjay Gaikwad : संजय राऊत म्हणजे चोराची…, संजय गायकवाड यांची ‘त्या’ टीकेवर जीभ घसरली
VIDEO | राज्यात असलेलं शिंदे सरकार हे बेकायदेशी सरकार आणि चोर लफंग्यांचं सरकार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. या टीकेवर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बघा काय म्हणाले...
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | राज्यात असलेलं सरकार हे बेकायदेशी आणि चोर लफंग्यांचं असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. या टीकेवर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘चोराची औलाद संजय राऊतच आहे. आमचे मत चोरुन संजय राऊत खासदार झाला आहे. शिंदे सरकार हे लोकशाही मार्गाने आलेलं सरकार आहे. जनतेनं उघडपणे शिंदे यांना मतदान केले आहे. त्यामुळे चोराने उलट्या बोंबा करु नये.’, असे म्हणत संजय गायकवाड यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. तर ज्यावेळी एकनाथ शिंदे, आम्ही शिवसेनेत होतो तेव्हा संजय राऊत कुठे होते. त्यावेळी राऊत बाळासाहेबांच्या विरोधात लिहायचे. बाळासाहेबांना रस्त्यावर आणण्याची भाषा करण्याऱ्याला शिंदे सरकारवर बोलण्याचा अधिकार नाही. जनता कुणाला रस्त्यावर फिरु देते, कुणाला नाही हे बघण्यासाठी पोलिस संरक्षण सोडून जनतेत फिरावे, संरक्षण सोडून बाहेर फीरुन दाखव, असे म्हणत संजय गायकवाड यांनी राऊतांना चॅलेंज दिले आहे.