‘…तर निवडणुकीआधी काँग्रेससोबत जायचं होतं’, भाजप नेत्यानं उद्धव ठाकरे यांना सुनावलं
VIDEO | 'लोक का सोडून जातात, याचं आत्मपरीक्षण करा', उद्धव ठाकरे यांना कुणी दिला सल्ला?
मुंबई, 30 जुलै 2023 | ठाण्यात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यानं जोरदार हल्लाबोल केला. ‘उपोषणं आणि आंदोलन करून तुम्ही आमची मंदिरं उघडी केली. त्यामुळे तुम्ही बेडगी हिंदुत्वावर बोलू नका. पाठीत खंजीर खुपसलं, मी खुलेआम काँग्रेसमध्ये गेलो. जर हिंमत होती तर निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये जायचं होतं. भाजपचे फोटो लावले आणि पंतपधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाह यांनी भाषणं केली म्हणून तुमचे १८ खासदार निवडून आहे. आता जर हिंमत असेल तर लोकसभेला उभं राहून दाखवा, आणि दोन खासदार निवडून आणून दाखवा’, असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी खुलं चॅलेंज उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
Published on: Jul 30, 2023 10:30 AM