Eknath Shinde Health Update : एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
eknath shinde health update : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळतेय. तर आजारी असताना देखील कोणत्याही आरामाशिवाय एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला होता.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्याने आज मंगळवारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना उपचारांसाठी ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळतेय. तर आजारी असताना देखील कोणत्याही आरामाशिवाय एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला होता. तर विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रकृती बरी नसताना भाषण करू नका, असा डॉक्टरांचा सल्ला असतानाही शिंदेंनी अनेक सभांमध्ये भाषणं केल्याचे पाहायला मिळाले. प्रचार करायचा असल्याने एकनाथ शिंदेंनी तात्पुरते उपचार घेऊन या झालेल्या घशाच्या संसर्गाकडे दुलर्क्ष केल्याची माहिती मिळतेय. मात्र संसर्ग वाढल्याने आज त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यापू्र्वी शिंदेंची डेंग्यूचा चाचणी करण्यात आली होती. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा आणि पांढऱ्या पेशी कमी झाल्या असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नसल्याने त्यांना रूग्णलयात दाखल केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे कुठेही बैठकीला जाणार नाही. मात्र दुपारी महापरिनिर्वाहादिन निम्मित अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीला व्हिसीद्वारे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय.