महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा गौरव

| Updated on: Jan 12, 2024 | 3:56 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी नाशिकमध्ये मराठीतून भाषण करत राजमाता माँ जिजाऊ साहेबांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या वीरभूमीत आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी, कोटी वंदन करतो, असे मराठीतून संबोधित केले.

नाशिक, १२ जानेवारी, २०२४ : स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने युवा महोत्सवाचं आयोजन नाशिक शहरात करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी नाशिकमध्ये मराठीतून भाषण करत राजमाता माँ जिजाऊ साहेबांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या वीरभूमीत आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी, कोटी वंदन करतो. जिजाऊंनी शिवाजीसारखा महानायक आपणास दिला. अहिल्यादेवीसारखी महाशक्ती महाराष्ट्राच्या धरतीने दिली, असे मोदी यांनी म्हटले. तर महाराष्ट्राच्या धर्तीवर अनेक महापुरुष घडले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये सांगितले. राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.

Published on: Jan 12, 2024 03:45 PM
ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदी यांचं नाशकात दणक्यात स्वागत, बघा VIDEO
Atal Setu Bridge Mumbai : भर समुद्रातून रायगडला पोहोचा, सागरी सेतू खुला; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण