मुख्यमंत्रिपदासाठी अव्वल पसंती कोणाला? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस?
VIDEO | राज्यातील मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला अव्वल पसंती? शिवसेनेच्या जाहिरातीतून काय केला दावा?
मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून काही वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या वृत्तपत्रातील जाहिरातीतून एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळाल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अव्वल पसंती देवेंद्र फडणवीस नाही तर एकनाथ शिंदे यांना अव्वल पसंती मिळाल्याचा दावा शिवसेनेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आला आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के पसंतीचा दावा शिवसेनेच्या जाहिरातीतून करण्यात आला आहे. राष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात शिंदे सेनेकडून वृत्तपत्रांमध्ये मोठी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. जाहिरातीतून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती, तर राज्यातील ४९.३ टक्के जनतेनं शिंदे फडणवीस जोडीला पसंती दर्शविल्याचा शिवसेनेच्या जाहिरातीतून दावा करण्यात आला आहे.