रात्रीस खेळ चाले? रात्री 12 वाजता मंत्री सत्तार अचानक जरांगे पाटलांकडे… नेमकं काय घडलं?
जवळपास दोन महिन्यांनंतर सरकारने पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे दिसतेय. कारण रात्री १२ वाजता मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेट झाल्याचे समोर आले आहे. नेमकी काय चर्चा झाली, बघा स्पेशल रिपोर्ट
एकनाथ शिंदे यांचे मंत्री अब्दुल सत्तार हे अचानक जालन्यातील अंतरवाली सराटीत दाखल झालेत. रात्री १२ ते साडे तीन वाजेपर्यंत म्हणजे साडे तीन तास मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. मुख्य चर्चा ही मराठा आरक्षणावरून झाल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांचा निरोप घेऊन अब्दुल सत्तार मुंबईत आलेत आणि आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात फोन वरून चर्चा झाली. मात्र हा फोन शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात होता, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तर दुसरीकडे फडणवीस यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Sep 06, 2024 11:52 AM