Eknath Shinde on Anil Parab: चुकीचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे- एकनाथ शिंदे
"महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. हे दुर्दैवी आहे. लोकशाहीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग हा सगळ्यांनाच घातक आहे. आम्ही कायदेशीर लढाई लढू," अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
“महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. हे दुर्दैवी आहे. लोकशाहीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग हा सगळ्यांनाच घातक आहे. आम्ही कायदेशीर लढाई लढू,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनिल परबांवर (Anil Parab ED Raids) कारवाई करण्यात आली आहे. परिवहन मंत्री असलेल्या अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी धडकले. त्यासोबत त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. याप्रकरणी सध्या त्यांची चौकशी (Anil Parab inquiry) केली जातेय. मुंबई, पुण्यासह रत्नागिरीतही अनिल परबांशी संबंधित मालमत्ता आणि ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. या संपूर्ण ईडी कारवाईनं अनिल परब चर्चेत आले आहेत.